HomeMalkapurकोलते इंजिनिअरिंगमध्ये ५ दिवसीय 'युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज' कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न; ९५...

कोलते इंजिनिअरिंगमध्ये ५ दिवसीय ‘युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज’ कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न; ९५ प्राध्यापकांचा सहभाग

-

कोलते इंजिनिअरिंगमध्ये ५ दिवसीय युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न ९५ प्राध्यापकांचा सहभाग

मलकापूर :
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मलकापूर मध्ये प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व नैतिक मूल्यांच्या रुजवणुकीसाठी आयोजित करण्यात आलेली पाच दिवसीय ‘युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज’ -II ही राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. दि. २३ मे ते २७ मे २०२६ या कालावधीत चाललेल्या या विशेष कार्यशाळेचे उद्घाटन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे , डॉ. वाय. ए. खर्चे आणि प्रा. रमाकांत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून व ईशस्तवन म्हणून अत्यंत पवित्र वातावरणात करण्यात आले. या कार्यशाळेला शैक्षणिक क्षेत्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह परिसरातील इतर नामांकित शिक्षण संस्थांमधील मिळून एकूण ९५ प्रशिक्षणार्थींनी यामध्ये आपली अधिकृत नोंदणी केली होती. बदलत्या सामाजिक परिप्रेक्ष्यात मानवी मूल्यांची जपणूक करणे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या पाच दिवसीय कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून पीसीसीओई, पुणे येथील प्राध्यापक डॉ. महेश कोलते लाभले होते. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच आपल्या अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि संवादात्मक शैलीत सर्व प्रशिक्षणार्थींना खिळवून ठेवले.

पहिल्या दोन दिवसांत मानवी मूल्यांचा मूळ उद्देश, आत्म-जागृती, आंतरिक शांतता आणि माणसाच्या मनातील वैचारिक सुसंवाद यावर सखोल प्रकाश टाकला. त्यांना सह-समन्वयक म्हणून प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बडनेरा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख व डीन डॉ. प्रवीण खंडवे तसेच सीआयबीएम-आरडी, नागपूर येथील डॉ. अजय तळवेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या दोन्ही सह-समन्वयकांनी तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी कौटुंबिक व सामाजिक मूल्ये, नातेसंबंधांतील परस्परांवरील विश्वास, आदर, निसर्गाचा समतोल आणि मानवाचे निसर्गाशी असलेले सहअस्तित्व या अत्यंत संवेदनशील विषयांवर विविध सराव सत्रांच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

कार्यशाळेच्या अंतिम दिवशी व्यावसायिक नैतिकता आणि मानवी मूल्ये व्यावसायिक जीवनात कशी अंमलात आणावीत, यावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थींकडून स्व-मूल्यमापन चाचणी व विविध कृती करून घेण्यात आल्या. या संपूर्ण पाच दिवसीय कार्यशाळेचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. जस्मीरकौर रंधावा यांनी निरीक्षक म्हणून हजेरी लावली होती. त्यांनी आपल्या मनोगतात कार्यशाळेच्या शिस्तीचे आणि उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करून सर्व शिक्षकांना प्रोत्साहन दिले. कार्यशाळेच्या सांगता समारंभात उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांना व मार्गदर्शकांना संस्थेच्या वतीने कृतज्ञतापूर्वक स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर भव्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन स्थानिक कार्यक्रम समन्वयक प्रा. पांडुरंग भिसे आणि प्रा. ख्याती चौधरी यांनी केले. या कार्यशाळेच्या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदिपभाऊ सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे तसेच सर्व सदस्य, प्राचार्य, डीन समन्वयक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले. उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी या कार्यशाळेत शिकलेली मूल्ये केवळ कागदावर न ठेवता आपल्या दैनंदिन शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात प्रत्यक्ष अंमलात आणण्याचा ठाम संकल्प केला. शेवटी औपचारिक आभारप्रदर्शनाने या यशस्वी कार्यशाळेची सांगता झाली.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts