
मुक्ताईनगर प्रतिनिधी…. भारताच्या जनगणना 2027 या कार्यक्रमानुसार मुक्ताईनगर येथे १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे व विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी पोर्टलच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीने (स्व- गणना) नोंदवून घेतलेली आहे. प्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे , निवडणूक नायब तहसीलदार झांबरे , मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मुख्यधिकारी सतीश पुदाके , जनगणना ऑपरेटर सिद्धांत बोदडे उपस्थित होते.
1 मे ते 15 मे दरम्यान स्व जनगणना ला सुरुवात झालेली असून आपण स्वतः आपल्या कुटुंबाची माहिती स्व गणना पद्धतीने स्वयंस्फूर्तीने भरून मोहिमेत आपण स्वतः व शेजारील नागरिकांनी सुद्धा सहभाग घेण्याचे आवाहन विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेले आहे.
भारत देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि योग्य नियोजनासाठी जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन करीत नागरिकांनी आपली जबाबदारी समजून १ मे ते 15 मे दरम्यान स्व गणना मध्ये 33 प्रश्नांची अचूक उत्तरे भरायची आहेत. मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी केलेले आहे.
प्रशासनाच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनी विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांचे खडसे फार्महाऊस वर व विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांकडून स्वतः कुटुंबाची स्व गणना भरून घेतली.




