Malkapur News

व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री ४.०’ विषयावर प्राध्यापक विकास कार्यक्रम संपन्न

मलकापूर, दि. १ नोव्हेंबर : स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) विभागाच्या वतीने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) अंतर्गत अटल अकादमी प्रायोजित सहा दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रम (फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम) २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान अत्यंत उत्साहात पार पडला.
‘डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स फॉर नोव्हेल मटेरिअल्स : द इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्री ४.०’ या विषयावर आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, प्रगत अभियांत्रिकी साहित्य आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीतील (इंडस्ट्री ४.०) नवनवीन तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान देऊन त्यांचे कौशल्य संवर्धन करणे हा होता.
या उपक्रमासाठी नोंदणी केलेल्या ६० पैकी ४८ प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. यामध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, पीएच.डी. अभ्यासक, पदव्युत्तर विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता.

या सहा दिवसांत आयआयटी इंदूर, एसव्हीएनआयटी सुरत, जैन अभिमत विद्यापीठ बेंगळुरू आणि नामांकित उद्योगांतील तज्ज्ञ डॉ. आय. ए. पलानी, डॉ. अशोक मतानी, डॉ. शैलेश आय. कुंडलवाल, डॉ. श्रीशैल बी. सोल्लापूर, डॉ. अमन खुराना, डॉ. विवेक डी. कल्याणकर, श्री. सुदर्शन धारुरकर, श्री. राजवर्धन साळुंके, श्री. मंगेश कुलकर्णी व श्री. सुधीर तापी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कॉम्पोझिट मशिनिंग, डिजिटल ट्विन, मटेरियल कॅरेक्टरायझेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, मटेरियल फेल्युअर इन्व्हेस्टिगेशन, डेटा-ड्रिव्हन मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रिअल आयओटी, प्रगत साहित्य व आधुनिक वेल्डिंग अशा विविध तांत्रिक पैलूंवर सखोल प्रकाश टाकला.
व्याख्यानांसोबतच कॅड/कॅम , मेजरमेंट सिस्टीम, मटेरियल टेस्टिंग, टीआयजी/एमआयजी वेल्डिंग, इंजिनिअरिंग मेटलर्जी आणि मेकॅट्रॉनिक्स या विषयांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण, शोधनिबंध सादरीकरण, गटचर्चा, बहुपर्यायी प्रश्नमंजुषा व रिफ्लेक्शन जर्नल उपक्रम राबविण्यात आले. दसरखेड एमआयडीसी येथील ‘फेरो ऑइलटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला दिलेली प्रत्यक्ष भेट या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. या औद्योगिक भेटीसाठी डॉ. धीरज देशमुख यांचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. वैभव विजय राणे यांनी उच्च शिक्षण संस्थांमधील व्यसनमुक्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव पाटील , सचिव डॉ. अरविंद कोलते यांच्यासह सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापन समिती सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक डॉ. युगेश ए. खर्चे, सहसमन्वयक व विभागप्रमुख प्रा. एस. आर. शेकोकार यांनी आयोजनाची धुरा सांभाळली.
आयोजन समितीत प्रा. डी. पी. खरात, प्रा. एम. पी. आचलीया, प्रा. एन. ए. खर्चे, प्रा. आर. एम. चौधरी, प्रा. संकेत पाटील यांच्यासह यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सक्रिय योगदान लाभले. व्यवस्थापन समिती, प्राचार्य व समन्वयकांनी अटल अकादमी, मार्गदर्शक तज्ज्ञ व सहभागी प्रतिनिधींचे आभार मानले.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Zafar Khan has 228 posts and counting. See all posts by Zafar Khan

Leave a Reply