Homemuktainagarमुक्ताईनगर येथे डंपर चालकाच्या धडकेत दोन आदिवासी तरुण ठार..... गुन्हा दाखल होत...

मुक्ताईनगर येथे डंपर चालकाच्या धडकेत दोन आदिवासी तरुण ठार….. गुन्हा दाखल होत नसल्याने आमदार चंद्रकांत पाटील पोहोचले थेट पोलीस ठाणे मध्ये

-

मुक्ताईनगर येथे डंपर चालकाच्या धडकेत दोन आदिवासी तरुण ठार….. गुन्हा दाखल होत नसल्याने आमदार चंद्रकांत पाटील पोहोचले थेट पोलीस ठाणे मध्ये

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
शहराला लागून असलेल्या खामखेडा रस्त्यावरील स्मशान भूमी जवळ मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास डंपर चालकाने दिलेल्या धडकेत दोन आदिवासी तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. इंदोर हैदराबाद 753 या रस्त्याचे काम सुरू असून रस्त्यावर डंपरची वर्दळ सतत सुरू आहे.
पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होत नसल्याने मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील थेट पोलीस ठाणे मध्ये पोहोचले. अपघात केलेले डंपर हे बी एन अग्रवाल यांच्या मालकीचे असून सूर्यास्तानंतर डंपरला परवानगी नसताना सर्रास वाहतूक सुरू असून आमदार पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित डंपर मालक व चालकावर मोठी कारवाई करून 304 अ प्रमाणे कारवाई करावी तसेच तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी सूर्यास्त नंतर सुरू असलेल्या डंपर वर कारवाई करण्याची मागणी ही आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. तसेच अपघात ग्रस्त यांच्या नातेवाईक यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलासा दिला.

राजकुमार गोपाल बारेला वय 18 वर्ष व राहुल गणपत ठाकुर वय 16 वर्ष दोन्ही राहणार मुक्ताईनगर मधील जुनी पिपरी रोड जवळ वास्तव्यास होते. मध्यप्रदेश मधील रोहिणी तालुका नेपानगर येथील मूळ रहिवासी असून गेल्या 16 वर्षापासून शेती कामासाठी मुक्ताईनगर येथे वास्तव्यास होते. या दोघांच्या घरच्यांनी प्रकाश नामदेव सावळे राहणार मुक्ताईनगर यांची नफ्याने शेती केली आहे. संध्याकाळी शेतीच्या कामासाठी राजकुमार गोपाल बारेला वय 18 वर्ष ,राहुल गणपत ठाकुर वय 16 वर्ष दोन्ही राहणार जुनी पिपरी रोड कडे हे दोघे रात्री घराकडे मोटरसायकल क्रमांक एमपी 68 झेड डी 8160 या क्रमांकाने जात असताना स्मशान भूमी जवळ डंपर क्रमांक एम एच 1862 याने या दोघांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.बारेला हा घरातील सर्वात लहान असून त्याला मोठे दोन भाऊ एक बहीण व आई-वडील असा सहा जणांचा परिवार आहे.
दुर्घटना होऊन दहा ते पंधरा घंट्याचा कालावधी झाला तरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. या आधी पण अशा अपघाताच्या घटना घडलेल्या असून पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी परिसरातून मागणी होत आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts