jalamb

जळंब पोलिसांची मोठी कारवाई; ५५.५७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

माटरगाव-भास्तन मार्गावर नाकाबंदी करून दोन बोलेरो पिकअप वाहनांसह मुद्देमाल जप्त

जळंब : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात वाहतूक करणाऱ्या दोघांना जळंब पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावतीच्या पथकाच्या मदतीने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पकडले. या संयुक्त कारवाईत ३४ लाख ५७ हजार १०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच दोन बोलेरो पिकअप वाहने असा एकूण ५५ लाख ५७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा चारचाकी वाहनांमधून बुलढाणा जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जात असल्याची गोपनीय माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती येथील पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत जळंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना माहिती देऊन कारवाईच्या सूचना दिल्या.

या माहितीच्या आधारे माटरगाव ते भास्तन मार्गावरील महालक्ष्मी कृषी तंत्र महाविद्यालयाजवळ पोलिसांनी सापळा रचून नाकाबंदी केली. यावेळी बोलेरो पिकअप क्रमांक एमएच २८ बीबी ७४९१ आणि एमएच ५६ सी ०५०१ या दोन वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

या प्रकरणी विश्वजित संजय गव्हांदे (वय २९, रा. शंकरनगर, खामगाव) आणि सुरेंद्र जानराव तायडे (वय ३६, रा. भीमनगर, जळगाव जामोद) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३४ लाख ५७ हजार १०० रुपये किमतीचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि २१ लाख रुपये किमतीची दोन बोलेरो पिकअप वाहने जप्त करण्यात आली.

याप्रकरणी जळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २७४, २७५, २२३, १२३ व ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळंब पोलीस करीत आहेत.

ही संयुक्त कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस हवालदार अब्दुल माजिद, पोलीस हवालदार एजाज अहमद, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद अमीर तसेच जळंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस हवालदार होनमाने, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, शिनगारे, काकडे आणि गाडेकर यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.

Latest

जळंब पोलिसांची मोठी कारवाई; ५५.५७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

टीपू सुल्तान के रॉकेटों ने दुनिया को दिखाई भारत की सैन्य तकनीक की ताकत; अंग्रेजों ने मैसूर से सीखी रॉकेट बनाने की कला

बुलढाणा येथे नवीन आधार सेवा केंद्र सुरू; नागरिकांना सातही दिवस सेवा उपलब्ध

उर्दू साहित्य, काव्य आणि पत्रकारितेतील मान्यवरांचा अल-फैज फाऊंडेशनतर्फे गौरव

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply