Malkapur

पुण्यात रंगणार ‘कोलते इंजिनीअरिंग’चा ग्रँड अल्युम्नी मीट २०२६

मलकापूर येथील Padmashri Dr. V. B. Kolte College of Engineering च्या वतीने संस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि भव्य माजी विद्यार्थी मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयाचे विविध वर्षांतील माजी विद्यार्थी रविवार, १७ मे २०२६ रोजी पुण्यातील आकुर्डी येथील सीझन्स बँक्वेट येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रँड अल्युम्नी मीट २०२६’ मध्ये एकत्र येणार आहेत. पुणे आणि परिसरातील नामांकित आयटी कंपन्या, उद्योग क्षेत्र तसेच विविध उच्च पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
“जुन्या आठवणींना पुन्हा जगूया, मैत्रीचे नाते पुन्हा जोडूया” या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याबाबत माजी विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाविद्यालयीन जीवनातील आठवणी, मित्रपरिवार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन पुन्हा अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार असल्याने अनेक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थितीची तयारी सुरू केली आहे.
रविवार, १७ मे रोजी सकाळी ८.१५ वाजता कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थ्यांच्या नोंदणीने होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जुन्या आठवणींना उजाळा देणारे सादरीकरण, संवाद सत्र, मनोगते तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार सुधीर पाचपांडे तसेच सदस्य देवेंद्र आर. पाटील, अनिल एल. इंगळे, डॉ. गौरव ए. कोलते आणि पराग डी. पाटील हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून ते माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. वाय. ए. खर्चे आणि आयक्यूएसी डीन प्रा. आर. एम. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती कार्यरत आहे. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डी. पी. खरात यांनी पुणे तसेच महाराष्ट्रातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी ८६०५५३०४७९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730