Buldhana News

पूर्व गणतंत्र परेड निवड चाचणीसाठी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची निवड

मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक ओम महेश नारखडे याची राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पूर्व गणतंत्र परेड निवड चाचणीसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामार्फत निवड करण्यात आली आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बुलढाणा जिल्ह्यातून केवळ दोन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची या निवड चाचणीसाठी निवड झाली असून, त्यामध्ये ओम महेश नारखडे याचा समावेश आहे. त्यामुळे त्याची निवड ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

पूर्व गणतंत्र परेड निवड चाचणी ही राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या शिस्त, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे मूल्यमापन करणारी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. या निवड प्रक्रियेतून पात्र स्वयंसेवकांची पुढील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी निवड केली जाते. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

याबाबत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांनी ओम महेश नारखडे याच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओमने राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

ओम महेश नारखडे याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे तसेच मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संतोष शेकोकार यांनी त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी त्याचे अभिनंदन करून पुढील निवड प्रक्रियेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील, सचिव डॉ. अरविंदजी कोलते आणि खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे यांनीही ओम महेश नारखडे याचे अभिनंदन केले. राज्य व राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ओम महेश नारखडे याच्या निवडीमुळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवा, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा निर्माण झाली आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Zafar Khan has 215 posts and counting. See all posts by Zafar Khan

Leave a Reply