पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम संपन्न

मलकापूर – येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने बी.टेक. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी एस. एम. टी. जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील प्रा. डॉ. अनिल पी. पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, आंतरवैयक्तिक कौशल्ये, सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यावसायिक विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. विद्यार्थ्यांसाठी हे सत्र अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे, उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे आणि आयक्यूएसी समन्वयक प्रा. आर. एम. चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रा. एस. एल. फरपट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. शारदा लांडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

