buldhana

धाड येथील भोंडे पेट्रोल पंप चोरी प्रकरणाची उकल, एक आरोपी अटकेत; 1.05 लाखांची रोख रक्कम जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उकल केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली 1 लाख 5 हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस ठाणे करीत आहे.

जिल्ह्यात दाखल गंभीर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक करण्यासह चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांनी स्वतंत्र पथके तयार करून धाड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 273/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) नुसार नोंद असलेल्या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी मोंढाळा (ता. जि. बुलढाणा) येथील स्वप्नील नुदाराम वाघमारे (वय 19) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेली 1 लाख 5 हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यामुळे या गुन्ह्यातील मुद्देमालाची शंभर टक्के वसुली करण्यात पोलिसांना यश आले आहे.

फिर्यादी खंडू संतोषराव भोंडे (वय 37, रा. म्हसला बु., ता. जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 ते 16 जुलै 2026 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपातून 1 लाख 5 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक आशीष रोही यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गौरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम अघाव आणि युवराज राठोड यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730