Malkapur News

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंडस्ट्री ४.०’ वर आधारित राष्ट्रीय पातळीवरील एआयसीटीई-अटल एफडीपीचे आयोजन

मलकापूर:
येथील लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ संचलित पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या ‘अटल’ अकादमी प्रायोजित सहा दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण वर्ग दिनांक २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार असून या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा मुख्य विषय “डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स फॉर नोव्हेल मटेरियल्स: द इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्री ४.०” असा ठेवण्यात आला आहे. आधुनिक उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्राध्यापक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना आधुनिक डिजिटल निर्मिती प्रक्रिया, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग तसेच प्रगत साहित्यावरील प्रक्रिया तंत्रांचे सखोल ज्ञान मिळावे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ मानांकन प्राप्त असलेल्या या मेकॅनिकल विभागाच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात देशभरातील नामवंत शिक्षण संस्था आणि आघाडीच्या उद्योगांमधील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आयआयटी इंदूर येथील डॉ. आय. ए. पालाने, डॉ. अमन खुराना व डॉ. शैलेश कुंडलवार; एसव्हीएनआयटी सुरत येथील डॉ. व्ही. डी. कल्याणकर; बंगळुरू येथील डॉ. श्रीशैल सोल्लापूर; सिम्युलेशन सेंटर पुणे येथील डॉ. दत्तात्रय पारले; पीएमएस रोबोटिक्सचे राजवर्धन साळुंके; चैतन्य बायोलॉजिकलचे सुधीर तापी; सिग्मा इलेक्ट्रिकल्सचे सुनील पाटील आणि बेंझोकेमचे मंगेश कुलकर्णी यांसारखे ख्यातनाम अभ्यासक इंडस्ट्री ४.०, डिजिटल ट्विन, आयओटी इन मॅन्युफॅक्चरिंग, कॉम्पोझिट मशिनिंग, सूक्ष्म-नॅनो मेकॅनिक्स, वेल्डिंग तंत्रज्ञान आणि औद्योगिक केस स्टडीज यांसारख्या विषयांवर थेट मार्गदर्शन करणार आहेत. एआयसीटीई संलग्न संस्थांमधील प्राध्यापक, पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी, संशोधक व उद्योग प्रतिनिधींसाठी ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली असून यासाठी केवळ ५० जागांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी एआयसीटीई-अटलच्या https://www.aicte-india.org/atal या अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘Participant’ म्हणून नोंदणी करावी आणि कोर्स कोड 1776058616 निवडून आपला अर्ज नोंदवावा; तसेच अधिक माहिती व मंजुरी पत्र पाठवण्यासाठी समन्वयक यांच्या yugeshkharche@coemalkapur.ac.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष डी. एन. पाटील, उपाध्यक्ष पी. डी. कोलते, सचिव डॉ. ए. डब्ल्यू. कोलते, खजिनदार सुधीर पाचपांडे आणि प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून कार्यक्रमाचे समन्वयक उपप्रचार्य डॉ. वाय. ए. खर्चे, सहसमन्वयक विभागप्रमुख प्रा. एस. आर. शेकोकार तसेच प्रा. एम. पी. आचलिया व प्रा. डी. पी. खरात हे विशेष परिश्रम घेत आहेत. तांत्रिक शिक्षण क्षेत्रात ज्ञान आणि संशोधनाला नवी दिशा देणाऱ्या या संधीचा शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Zafar Khan has 221 posts and counting. See all posts by Zafar Khan

Leave a Reply