Malkapur

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विविध दाखले महिनाभरापासून पेडींग शैक्षणिक नुकसान; शिवसेना (उद्धवसाहेब ठाकरे) चा आंदोलनाचा इशारा

मलकापुर:- विद्यार्थ्यांचे जातीचा दाखला,नाॅनक्रिमिलेयर, उत्पन्न दाखला,सह आदिं शैक्षणिक दाखले गेल्या महिन्याभरापासून तहसील कार्यालयात पेडींग असल्याने आज शिवसेना (उबाठा)च्या वतीने उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन देऊन दोन दिवसात दाखले मार्गी लावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले तहसील कार्यालयात पेंडिंग असल्याने पालकांना, विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक,मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. सर्व प्रकारच्या सीईटींचे परीक्षांचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 10 फेब्रुवारी 26 असून वेळेच्या आत दाखले जमा न केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.गेल्या महिनाभरापासून तहसील कार्यालयात जवळपास 300 चे आसपास उत्पन्नाचे दाखले,80 ते 90 डोमीसाईल, 189 नाॅनक्रिमिलेयर,150 जातीचे दाखले सह आदी दाखले तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या टेबलवर पडून असल्याची माहिती असून दोन दिवसात पेडींग दाखल्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास शिवसेना च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, नगरसेवक रफीकभाई बर्तनवाले,युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेहेंगे, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै.रहीम, दीपक कोथळकर, हसन गौरी,सत्तार शाह,शेख करीम शेख गफार, शेख मोहसीन शेख छोटू, शेख रफिक शेख नबी, ज्ञानदेव पाटील, रशीद गौरी सह आदींनी दिला आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730