Malkapur

कल्पा सोलर पाॅवर कंपनीत सुरक्षा रक्षकांना आठ तास ड्युटीच्या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) चे ए.एम.एस कार्यालयात ठिय्या आंदोलन

मलकापुर:- एलिव्हिएट मॅनेजमेंट सर्विस प्राइवेट लिमिटेड (ए एम एस) कंपनीमार्फत कल्पा सोलर पाॅवर कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकांना तब्बल 12 -12 तास काम करावे लागत आहे, कामगारांवर हा अन्याय असून त्यांना कामगार कायद्यानुसार आठ तासांची ड्युटी देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी केली असून आज ए एम एस कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आठ दिवसात सुरक्षारक्षकांच्या मागण्या मंजूर न केल्यास दि. 26 मे 26 रोजी कल्पा सोलर पाॅवर कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की कल्प पावर कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकांकडून बारा-बारा तास काम करून घेतले जात आहे,ते कामगार कायद्यानुसार आठ तासांचे करण्यात यावे तसेच पी.एफ ही अत्यल्प मिळत असून पुढे पावसाळा सुरू होणार असून सिक्युरिटी कॅबिन बनवली आहे ती अत्यंत छोटी असून एक गार्ड सुद्धा त्या कॅबिनमध्ये बसू शकत नसल्याने त्या कॅबिनची लांबी रुंदी वाढवून त्या ठिकाणी दोन गार्ड बसू शकतील अशी केबिन बनविण्याची मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सुरक्षारक्षकांच्या मागण्या मंजूर न झाल्यास 26 मे पासून कल्प पावर कंपनी समोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे,वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, सुरक्षा रक्षक अमित राजपूत, प्रदीप हिरळकर, समाधान सोनवणे, दीपक तायडे ,आनंद तायडे ,सागर तायडे, ओम पाटील, राजेश नाफडे, अतुल चोपडे, संदीप बोदडे ,धनराज बोदडे, भास्कर सोनवणे, गणेश सोनवणे, विजय राणे, दीपक पाटील, ऋषिकेश तायडे, विलास तायडे, आनंद तायडे ,संजू पवार, संघपाल तायडे, सुभाष शिंदे, सिद्धूधन गुरुचळ, राहुल गुरूचळ, अनिरुद्ध गुरुचळ, सुरेंद्र गुरूचळ, ज्ञानेश्वर सोनवणे सह आदी सुरक्षा रक्षकांच्या स्वाक्षऱ्यांना मुद्दा आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730