
उदयनगर : सहाय्यक संचालक, हिवताप व हत्तीरोग, अकोला डॉ. अन्सारी यांनी मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (एडीएमओ) होगे यांच्या समवेत शनिवार दि.११ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, उदयनगर येथे आकस्मिक भेट देऊन विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान डॉ. अन्सारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती घेतली. कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.यानंतर त्यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन सूक्ष्मदर्शकाद्वारे करण्यात येणाऱ्या तपासणी प्रक्रियेची पाहणी केली. तसेच प्रयोगशाळेतील विविध नोंदींची तपासणी केली. गप्पी मासे पैदास केंद्रालाही त्यांनी भेट देऊन डास नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील खंडागळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भातील माहिती सादर केली व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
