HomeChikliअमडापूर पोलिसांची अवैध हातभट्टीवर धडक कारवाई; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाख

अमडापूर पोलिसांची अवैध हातभट्टीवर धडक कारवाई; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाख

-

IMG 20260709 WA0403

अमडापूर : अमडापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने आज दि.९ जुलै रोजी डोंगरशेवली शिवारातील दरी-खोऱ्यात जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व साहित्य जप्त करून नष्ट केले.
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेदार जयसिंग राजपूत यांनी पथकासह घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत रेखाबाई सुनील पवार व मंगलाबाई गणेश पवार (रा. डोंगरखंडाळा, ता. चिखली) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.
रेखाबाई पवार हिच्याकडून १४ लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत ६०० रुपये) तसेच ३,४३० रुपयांचा इतर मुद्देमाल, तर मंगलाबाई पवार हिच्याकडून १४ लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत ७०० रुपये) व ३,६५० रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी आढळून आलेली हातभट्टी दारू व सडवा नष्ट करण्यात आला.ही कारवाई ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) निवृत्ती चेके, पोलीस हवालदार बिलगे, पोलीस शिपाई चंद्रशेखर मुरडकर, दुर्गासिंग ठाकूर, रंजीत सरोदे, चालक चिंचोले तसेच महिला पोलीस अंमलदार वैशाली आराख यांनी पार पाडली.
या प्रकरणी दोन्ही महिला आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ASI निवृत्ती चेके करीत आहेत.

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts