Homebuldhanaहवामान अभ्यासक तोडकर; अमडापूर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

हवामान अभ्यासक तोडकर; अमडापूर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

-


या वर्षीही समाधानकारक पाऊस; काळजी करू नका

उदयनगर :या वर्षीही भरपूर पाऊस पडणार असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे प्रतिपादन हवामान अभ्यासक अशोकराव तोडकर यांनी केले.
अमडापूर परिसरातील शेतकऱ्यांनी हवामान अभ्यासक तोडकर यांच्याशी संपर्क साधून हवामान व पावसाची विचारपूस करून नुकतीच पेरणी केली आहे. ही पेरणी यशस्वी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार तोडकर यांनी आज, दि. ४ जुलै रोजी सायंकाळी
अमडापूर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पावसाविषयी मार्गदर्शन केले. यावर्षी मोठा पाऊस ऑगस्टनंतर पडणार आहे. तोपर्यंत संपूर्ण जुलै महिनाभर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून, पिकेही येणार आहेत. पावसासाची परिस्थिती मागील वर्षांप्रमाणेच राहणार असून भरपूर पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी तुळशिदास ढोले, श्याम जुमडे, बंडू ढोले, रवी पाखरे, बंटी देशमुख, राजू
खंदलकर, संतोष इंगळे, डिगांबर हरकाळ, मनोज नगरे, सुमित ढोले, घनश्याम जैस्वाल, शरद खाजभागे, विजय भालेराव, विजय खंडारे, श्रीकांत गिहे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून तोडकर यांचे स्वागत केले. तसेच त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान हवामान अभ्यासक तोडकर यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन केल्यामुळे उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts