
सर सय्यद अहमद खान उर्दू ज्युनिअर कॉलेज, अमडापूर येथे केंद्र प्रमुख जमीर रजा यांच्या हस्ते वितरण; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
उदयनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मानव विकास योजनेअंतर्गत सर सय्यद अहमद खान उर्दू ज्युनिअर कॉलेज, अमडापूर येथे ४२ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. केंद्र प्रमुख जमीर रजा यांच्या हस्ते हा वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी सैफुल्ला सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थींना सायकलींचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शाळेत ये-जा करण्याचा प्रवास अधिक सोयीचा होणार असून त्यांच्या शिक्षणाला चालना मिळणार आहे.
कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष शेख आजम, प्राचार्य शेख जफर पटेल,प्रा. रिजवानुल्लाह खान, प्रा. म.आबिद,प्रा. मो. मोईन अख्तर, प्रा.शोएब उल्लाह खान, प्रा.मोहम्मद रहेमान, प्रा.सोहेल खान तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोहम्मद तौफिक, मोहम्मद समीर आणि शेख जव्वाद दानिश उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. सायकली मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत शिक्षणात सातत्य, शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
