मलकापुर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची शिवसेना (उबाठा)ची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मलकापुर:- मलकापूर तालुक्यामध्ये जून महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या अत्यल्प पाऊस पडल्यामुळे बियाणे उगवण्याची क्षमता ६० टक्के होती. त्यानंतर जुलै महिन्यात अतिवृष्टी होवून 20 ते 25 टक्के पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर एक ते दीड महिन्यापासून पावसाने उघड दिली असल्याने मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग व कोरडवाहू पिके सुकू लागले त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून त्यांना पिक विमा मिळावा व मलकापुर तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करावा तसेच शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली परंतु बॅकेचे अधिकारी शेतकऱ्यांना नविन पिक कर्ज देण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ओढवले आहे कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना तातडीने बॅकांनी नवीन पिक कर्ज तात्काळ द्यावे अन्यथा 5 सप्टेंबर 26 रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा आज दि.31 ऑगस्ट 26 रोजी निवेदनाद्वारे तहसीलदार समाधान सोनवणे यांना दिला आहे.निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, विभागप्रमुख सत्तार शाह,शाखा प्रमुख विजय झांबरे, शाखाप्रमुख रफीकभाई पजायेवाले, ओंकार पाटील सह शेतकरी व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सह्या नमूद आहे.

