Homemuktainagarमुक्ताईनगर येथील जे ई स्कूल मध्ये राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता 2025-26 या...

मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल मध्ये राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता 2025-26 या शैक्षणिक वर्षात शाळेकडून राबविण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचे मूल्यांकन करण्यासाठी निवड समितीचे आगमन

-

मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल मध्ये राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता 2025-26 या शैक्षणिक वर्षात शाळेकडून राबविण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचे मूल्यांकन करण्यासाठी निवड समितीचे आगमन

मुक्ताईनगर प्रतिनिधी….

जे.ई.स्कूल मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर जि.जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्याकडून राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता 2025-26 या शैक्षणिक वर्षात शाळेकडून राबविण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचे मूल्यांकन करण्यासाठी निवड समितीचे आगमन झाले. सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार हार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली.सुत्रसंचलन एस.आर. ठाकूर तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी.वंजारी यांनी केले.प्राचार्य व्ही.एम.चौधरी यांच्याकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.सदर प्रसंगी राज्यस्तरीय प्रतियोगीता समन्वयक गिरिश कुलकर्णी, विश्वजित पाटील, संजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास गिरिष कुलकर्णी यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छते जागृत असले पाहीजे यासंदर्भात मार्गदर्शन केले.जे.ई.स्कूल मुक्ताईनगर शाळेची या राज्यस्तरीय प्रतियोगितेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड करण्यात आली आहे हे विशेष.सदर अंतिम प्रतियोगितेसाठी 42 शाळांची निवड करण्यात आलेली आहे.सहशालेय उपक्रमातून राबविण्यात आलेले सामाजिक उपक्रम,स्वच्छतेसंदर्भातील जनजागृती,आरोग्यविषयक ,तंबाखूमुक्त शाळा यासंदर्भातील सर्व राबविण्यात आलेले उपक्रम याची अहवालात्मक तपासणी तसेच शालेय परिसरातील स्वच्छतेबाबत मान्यवरांकडून पाहणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यी व सर्व शिक्षकवृंद यांच्यांशी संवाद साधून चर्चा करण्यात आली.सदर प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एम.चौधरी यांच्याकडून वर्षभरात राबविण्यात आलेल्या आलेल्या सर्व कार्यक्रमाचे दस्तावेज फाईल मान्यवरांकडे देण्यात आले.तसेच मूल्यांकन समितीकडून शाळेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेले गांधी विचार संस्कार पुस्तक भेट देण्यात आले.सदर कार्यक्रमास प्राचार्य व्ही.एम.चौधरी ,उपप्राचार्या व्ही.के.शिर्के,पर्यवेक्षक व्ही.डी.ब-हाटे ,के.आर.कवळे ,समन्वयक एस.बी.वंजारी ,तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आभार एस. आर.ठाकूर सर यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Related articles

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts