मुक्ताईनगर प्रतिनिधी……..
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जे ई स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुक्ताईनगरचा बारावी परीक्षेचा निकाल 88. 70 टक्के लागला. परीक्षेत प्रविष्ट 558 विद्यार्थ्यांपैकी 495 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाने गौरवशाली निकालाची परंपरा कायम राखली आहे विज्ञान शाखा…….. विज्ञान शाखेचे 374 पैकी 365 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विज्ञान शाखेचा निकाल 97.59% लागला, विज्ञान शाखेतून कु. लक्ष्मी विजय पाटील व कु. ऐश्वर्या सुरेश नाले या दोन्ही विद्यार्थिनी 507 गुण 84.5 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आल्यात. या शाखेतून विनीत नितीन पाटील 491 गुण 81.83% हा द्वितीय तर मानस प्रमोद पाटील हा विद्यार्थी 482 गुण 80.33% मिळून तृतीय आला. कला शाखा…..
– या शाखेत प्रविष्ट 126 विद्यार्थ्यांपैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल 65.07% लागला
प्रथम -कु.कोमल किशोर हिरोळे – 426 गुण — 71%
द्वितीय – कु.प्रेरणा रमेश पोहेकर -372 गुण..62%
तृतीय – कु नीलिमा मिलिंद लवंगे -360 गुण -60%
वाणिज्य शाखा -…….
या शाखेतील 58 पैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ८२.७५ टक्के लागला.
प्रथम -भूषण सुभाष पाटील – 387 गुण — 64.5%
द्वितीय – दीपक उल्हास पाटील -362 गुण — 60.33%
तृतीय – शुभम समाधान धनगर -347 गुण — 57.83%
किमान कौशल्य विभाग…
– या विभागातून प्रविष्ट 46 विद्यार्थ्यांपैकी 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल 80.43% लागला
प्रथम -ऋषिकेश ब्रिजलाल बोरे .
320 गुण -53.33%
द्वितीय –कु भाग्यश्री श्रावण कोळी
303 गुण -50.50%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ आमदार एकनाथराव खडसे, संस्थेच्या चेअरमन ऍड.सौ.रोहिणी खडसे खेवलकर, उपाध्यक्ष नारायणराव चौधरी, सचिव डॉ. सी एस चौधरी व संचालक पुरुषोत्तम महाजन, चंद्रशेखर बढे, रमेश खाचणे,आर पी बऱ्हाटे, महेश पाटील आदींसह विद्यालयाचे प्राचार्य विकास एम.चौधरी,उपमुख्याध्यापिका श्रीमती वंदना शिर्के,पर्यवेक्षक के आर कवळे, व्ही डी बऱ्हाटे, एस पी राठोड, सौ व्ही एस राणे यांचेसह सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
