Top 5 This Week

Related Posts

44° तापमानात टीनपत्र्याच्या खोलीत शिष्यवृत्ती परीक्षा; मलकापूरात शिवसेना (उबाठा) सह पालक संतप्त…

44° तापमानात टीनपत्र्याच्या खोलीत शिष्यवृत्ती परीक्षा; मलकापूरात शिवसेना (उबाठा) सह पालक संतप्त… शिवसेना उपजिल्हाप्रमुख (उबाठा) गजानन ठोसर यांनी शिक्षणाधिकारी फाळके यांची केली कान उघाडणी… उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांशी निष्काळजीपणा; शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…

मलकापुर:- तालुक्यात गेल्या 4-5 दिवसांपासून प्रचंड उष्णतेची लाट सुरू असताना मलकापूर येथील चौथीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तब्बल 44 अंश तापमानात गोविंद विष्णू महाजन विद्यालयात घेण्यात आली. भर दुपारी लहान विद्यार्थ्यांना टीनपत्र्याच्या खोलीत बसवण्यात आल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.याबाबतची माहिती पालकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरीदास गणबास यांना दिली,अत्यंत उष्ण हवामानात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सोयीस्कर , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून योग्य नियोजन न झाल्याचे दिसून आले. इतर जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी शिक्षणाधिकारी फाळके यांची भ्रमणध्वनीद्वारे कान उघाडणी केल्याने फाळके यांनी तात्काळ परीक्षा केंद्रावर धाव घेतली यावेळी उपस्थित पालकांनी शिक्षणिधिकारी फाळके यांच्या अनागोंदी कारभारा विषयी रोष व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी केली आहे.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles