Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथील अल्पसंख्यांक शासकीय तंत्र निकेतन महावि‌द्यालयास अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी

मुक्ताईनगर येथील अल्पसंख्यांक शासकीय तंत्र निकेतन महावि‌द्यालयास अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी….. पदाधिकारी यांनी दिले उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..मुक्ताईनगर येथील अल्पसंख्यांक शासकीय तंत्र निकेतन महावि‌द्यालयास अजितदादा पवार याचे नाव देवून सुरु करण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री सुनेत्रा पवार यांचेकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान दुट्टे, मुक्ताईनगर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आसिफ बागवान यांनी केली आहे.

मुक्ताईनगर येथील अल्पसंख्यांक शासकीय तंत्र निकेतन महावि‌द्यालय सन २०१६ मध्ये मंजूर झाले आहे. अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत ५५ कोटी किमतीच्या शासकीय तंत्र निकेतन इमारतीचे बांधकाम मुक्ताईनगर येथील गट नं.६३० मधील ८.५ हेक्टर क्षेत्रावर करण्यात येत आहे. यापैकी मुख्य इमारत व कार्यशाळेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. व अजीतदादा पवार यांनी या कामामध्ये वेळोवेळी लक्ष्य देवून काम प्रगती पथावर आणले आहे.

महाराष्ट्रातील पहिले अल्पसंख्यांक शासकीय तंत्र निकेतन महावि‌द्यालय सुरु झाल्यास आजूबाजूच्या परिसरातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल,

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles