Malkapur News

विवरा रणगांव अपूर्ण रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेना (उबाठा)चे निवेदन

अन्यथा स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी महीला ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा

मलकापुर:-तालुक्यातील विवरा -रणगांव अपूर्ण रस्ता, नाला खोलीकरण व रुंदीकरण अपूर्ण काम पूर्ण करणे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग याचे मार्फत मंजूर काम गावठाण ओंकार चोपडे यांचे घरापासून मधुकर हरी पाटील यांच्या वाड्यापर्यंत काँक्रीट रस्ता पूर्ण करणे, जन्म मृत्यू नोंदीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी करायच्या प्रक्रियेतील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात आदी मागण्याचे शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात विवरा येथील ग्रामस्थ व महिलांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना दि.3 ऑगस्ट 26 रोजी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, विवरा रणगांव रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना पावसाळ्यात जिव मुठीत धरून ये – जा करावे लागते,नाला खोलीकरण व रुंदीकरण काम संबंधित ठेकेदाराने अर्धवट सोडून पोबारा केल्याने पावसाळ्यात पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थांचे,शेतीमालाचे गतवर्षी सारखे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे,जि.प बांधकाम विभागाअंतर्गत ओंकार चोपडे यांचे घरापासून मधुकर हरी पाटील यांच्या वाड्यापर्यंतचा काॅक्रीट रस्ता तात्काळ पूर्ण करावा, जन्म मृत्यू नोंदीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी करावयाच्या प्रक्रियेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली असून उपरोक्त मागण्या दि.14 ऑगस्ट 26 पर्यंत पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 26 रोजी ग्रामस्थ , महीला व शिवसेना पदाधिकारी आमरण उपोषण करतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, ओंकार शेषराव पाटील, गजानन मुरलीधर फिरके, झेंडू पांडू तायडे, वासुदेव कृष्णा भोगे, सुरज बोंडे, दीपक कोथळकर,रफिक भाई पजायवाले, बेबाबाई सांगळकर, सविता धाडे, रेखा वाडसे, सुशीला कळमकर, राधा सांगळकर, शीलाताई वाळसे, सह ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सह्या नमूद आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Zafar Khan has 211 posts and counting. See all posts by Zafar Khan