मलकापूरच्या व्ही. बी. कोलते कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापन व CPR जनजागृती

मलकापूर
पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादावर आधारित विशेष जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून प्रा. एम. आर. चौधरी यांनी काम पाहिले. वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी मानवी जीवन वाचवण्यासाठी आवश्यक असणारे प्राथमिक कौशल्य आणि आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिळावेत, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक आणि साधन व्यक्ती म्हणून अकोला येथील श्री आर. एल. टी. कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. सुधीर कोहचाळे उपस्थित होते. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत कशी करावी याविषयी अत्यंत सखोल आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
प्रा. कोहचाळे यांनी ‘बेसिक लाईफ सपोर्ट’) चे महत्त्व विशद करताना हृदयरोग किंवा अपघाताच्या प्रसंगी दिले जाणारे ‘कार्डिओपल्मोनरी रेस्टिट्युशन’ कसे करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये त्यांनी ३० वेळा छातीवर दाब देणे आणि २ वेळा कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे या अचूक तंत्राची माहिती दिली, तसेच तोंडाने कृत्रिम श्वास देण्याच्या योग्य पद्धती समजावून सांगितल्या. या सत्रादरम्यान उपस्थितांना हेड टिल्ट-चिन लिफ्ट मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्स टेम्पोरोमँडीब्युलर जॉ यांसारख्या तांत्रिक पद्धती, श्वासोच्छ्वासाचे विश्लेषण आणि हृदयविकाराच्या झटक्याची पूर्वलक्षणे कशी ओळखावीत, याचे सविस्तर धडे देण्यात आले. या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी घाबरून न जाता आत्मविश्वासाने मदत कशी करावी, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना मिळाले.
या जनजागृती कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे, डॉ. एम. यू. करंडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एम. आर. चौधरी, प्रा. एम. आर. राजपूत, प्रा. पी. बी. पट्ठे, प्रा. बी. ए. नारखेडे, प्रा. एस. एम. बोरले, प्रा. पी. ई. मापारी, प्रा. वाय. एस. पाटील, प्रा. डी. एम. लढे, प्रा. एस. एस. इखारे, प्रा. शीतल इंगळे, प्रा. शुभांगी निवाणे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी ललीत तायडे, अपूर्वा खर्चे, कारंगळे सर, अजिंक्य बऱ्हाटे आणि सोनल शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब पाटील, सदस्य श्री. अनिल इंगळे, श्री. देवेंद्र पाटील, श्री. पराग पाटील आणि डॉ. गौरव कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपत्तीपूर्व तयारी आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादाबाबत अमूल्य ज्ञान देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे आणि उत्साहात पार पडला.

