Malkapur News

प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांनी नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या राष्ट्रीय परिषदेत नोंदविला सहभाग

मलकापूर (विशेष प्रतिनिधी) :
स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांनी नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन’ (भारतीय लोक प्रशासन संस्था – आयआयपीए) च्या ७० व्या सदस्य वार्षिक बैठक आणि ७२ व्या सर्वसाधारण सभा अंतर्गत आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. हा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित कार्यक्रम दिनांक ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील संस्थेच्या मुख्य सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला.
या भव्य राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन भारताचे माननीय उपराष्ट्रपती तथा भारतीय लोक प्रशासन संस्थेचे अध्यक्ष श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपस्थित प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी देशाच्या गतिमान विकासात आधुनिक प्रशासन, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि नैतिक मूल्यांची आवश्यकता अधोरेखित केली. याप्रसंगी संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी प्रशासकीय सुधारणा आणि डिजिटल भारताच्या संकल्पावर भर देत शिक्षण व प्रशासनातील समन्वय स्पष्ट केला. तसेच संस्थेचे महासंचालक डॉ. सुरेश कुमार बागडे यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या दोन दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठीमध्ये प्रामुख्याने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) च्या प्रभावी आणि जबाबदार वापरातून भारतीय प्रशासन व्यवस्था अधिक कार्यक्षम, पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख कशी करता येईल, या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल तांत्रिक आणि धोरणात्मक मंथन करण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहिलेले वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी, भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी, विविध मंत्रालयांतील वरिष्ठ प्रशासकीय धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी या चर्चासत्रात आपले मौलिक विचार मांडले.

या दौऱ्यादरम्यान प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव तथा संस्थेच्या मुंबई प्रादेशिक शाखेचे अध्यक्ष श्री. एस. एस. क्षत्रिय यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या परिषदेच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. खर्चे यांना राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी, संशोधक आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची तसेच आधुनिक प्रशासनात अभियांत्रिकी व नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर विचारांचे आदान-प्रदान करण्याची महत्त्वपूर्ण संधी लाभली.

प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील सहभागामुळे शैक्षणिक नेतृत्वासोबतच आधुनिक प्रशासकीय कौशल्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेचा संस्थात्मक वापर आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थापनाविषयीचे त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे तसेच सदस्य श्री. अनिल इंगळे, श्री. देवेंद्र पाटील, श्री. पराग पाटील व डॉ. गौरव कोलते या सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Zafar Khan has 230 posts and counting. See all posts by Zafar Khan

Leave a Reply