muktainagar

तरोडा येथील संजना हिवरकरने नेपाळ येथे राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्णपदक.

मुक्ताईनगर प्रतिनिधी… नुकत्याच राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धा 2026 पोखरा, नेपाळ येथे 8 ते 11 मे दरम्यान सतरा वर्षे वयोगटातील व ६० किलो गटातील स्पर्धकांच्या घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी असलेली संजना गजानन हिवरकर हल्ली मुक्काम ठाणे ( मुंबई) हिने स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
संजना हिवरकर हिने थाय लाईट स्पर्धेत एक सुवर्णपदक व संगीतथाय या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये एक सुवर्णपदक असे दोन सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय थाय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशिक्षक पी. वाय. अत्तार यांचे संजना हिला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संजना हिवरकर हिचे ठाणे येथील विद्यालयात व मुक्ताईनगर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Sandeep Jogi

Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595