Homemuktainagarमुक्ताईनगरात अनधिकृत खतांचा साठा जप्त प्रकरणी सुनावणी होईल ... जिल्हा परिषदेचे कृषी...

मुक्ताईनगरात अनधिकृत खतांचा साठा जप्त प्रकरणी सुनावणी होईल … जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाथ म्हस्के

-

मुक्ताईनगर प्रतिनिधी: ……. जिल्ह्यात बनावट आणि अनधिकृत खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाने मुक्ताईनगर येथील भूमी विकास ॲग्रो एजन्सी’ च्या गोडाऊन वर छापा टाकून 3 लाख 92 हजार 500 रुपयाचा संशयास्पद साठा ११ एप्रिल रोजी जप्त केला होता. या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पथकाने गोदाम सील केलेले असून याप्रकरणी पुढील आठवड्यात सदरच्या कृषी केंद्र संचालका विरुद्ध सुनावणी होणार असून यामध्ये एजन्सी वर कारवाई सुद्धा होणार असल्याचे जिल्हा भरारी पथकातील प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाथ म्हस्के यांनी सांगितले.

मुक्ताईनगर येथील भूमी विकास ऍग्रो एजन्सी च्या गोदामामध्ये संशयास्पद आढळलेला खत साठ्याचे प्रकरणी खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी जिल्हा परिषद जळगावचे अविनाश खैरनार यांनी पोलिसात फिर्याद दिलेली असून मे. त्वरिता ऍग्रो कंपनी जळगावचे संचालक नाव माहित नाही यांचे विरुद्ध विनापरवाना बेकायदेशीर रित्या खताचे उत्पादन व विक्री केल्याचे कारणावरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली स पो नी जयेश पाटील करीत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत असल्याचे खतनिरीक्षक अविनाश खैरनार यांनी सांगितले.
@@@ जप्त केलेला खतांचा साठा असा…..
17500 रुपये किमतीचे सल्फेट ऑफ पोटॅश खताच्या 25 किलोच्या पाच बॅग,
375000 रुपये किमतीचे मोनो पोटॅशियम फॉस्फेट खताच्या 25 किलोच्या 50 बॅग असा 3 लाख 92 हजार पाचशे रुपयांचा साठा मिळून आला होता.
जिल्हा भरारी पथक प्रमुख पद्मनाथ म्हस्के, मोहीम अधिकारी अविनाश खैरनार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे ,तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुभाष धायडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Related articles

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts