muktainagar

अखेर ८ कर्मचाऱ्यांना देण्यात आली कारणे दाखवा नोटीस …. सारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील प्रकार.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…. तालुक्यातील सारोळा जलशुद्धीकरण केंद्रामधील असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये मृत बैल आढळला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल वराडे यांनी ८ वर्ग चार कर्मचाऱ्यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे.३ जून पर्यंत सर्वांकडून खुलासा मागितलेला असून जलशुद्धीकरण केंद्रातील ( टीपीओ) प्लांट ऑपरेटर बी एस मराठे हे 18 मे पासून वैद्यकीय रजेवर असल्याचे श्री वराडे यांनी सांगितले.

बोदवड सह मुक्ताईनगर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावरील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्र सारोळा येथील अंडरग्राउंड असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये मृत अवस्थेत बैल 31 मे रोजी आढळला होता. या संताप जनक घटनेमुळे ग्रामस्थ रस्त्यावर आले होते.
28 मे रोजी जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे दीड ते दोन लाख पाण्याची क्षमता असलेल्या अंडरग्राउंड पाण्याच्या टाकीमध्ये बैल पडला होता. 28 ते 31 तारखेपर्यंत पाण्याच्या टाकीजवळ तेथील कर्मचारी कसे गेले नाहीत हा एक प्रश्न आहे. नागरिकांच्या आरोग्याची खेळ करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जाधव यांनी सांगितले होते.

रविवारी रात्रीपासून ‘ त्या ‘ पाण्याच्या टाकीचे कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर स्वच्छता करण्यात आली. तसेच सोमवारी दुपारी चार वाजता पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे मुक्ताईनगर ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता एस. एम. पाटील यांनी सांगितले.
… या कर्मचाऱ्यांना दिली नोटीस……
कर्मचारी एच के शिंदे, एम एन पाटील ,आर आर कचरे, के आर चाटे, एस एन निकम ,के बी मोरे, जे एल कोळी, एस आर धनगर यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे.

Sandeep Jogi

Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595