muktainagar

मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली पंचायत समिती मध्ये आढावा बैठक.

….. तालुक्यात 14 गावांमध्ये पाणीटंचाई, 9 गावांचे विहीर अधिग्रणाचे आदेश.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…. घरकुला सहित विविध कामांचा आढावा घेण्यासाठी 19 मे रोजी मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
गटविकास अधिकारी रमेश सपकाळे, माफदाचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, दिलीप पाटील, प्रभाकर पाटील यांचे सह विस्ताराधिकारी ,विविध विभागाचे अधिकारी तसेच ग्रामसेवक, पत्रकार उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला गटविकास अधिकारी रमेश सपकाळे यांनी मागील अहवालाचे वाचन केले.
तालुक्यातील 14 गावांमध्ये पाणीटंचाई भासत असून
या गावांनी विहीर अधिकरणाचे प्रस्ताव पाठविले होते. पैकी नऊ गावांचे विहीर अधिग्रहणाचे आदेश तहसीलदार यांनी दिलेले आहेत.
तालुक्यातील निमखेडी खुर्द , मेळसांगवे, पंचाणे,वायला, टाकळी, अंतुरली ,चारठाणा, चिखली कोथळी ,वडोदा या गावांमध्ये ग्रामसेवकांची पदे रिक्त असून काही ग्रामसेवकांकडे चार गावांचा पदभार असल्याचे बैठकीमध्ये उघडकीस आले.
बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना ,मोदी आवास योजना, शबरी आवास योजना याविषयी आढावा घेण्यात आला.
ग्रामसेवकांनी तत्परतेने काम करावे, गावात पाणीटंचाई भासू देऊ नये याकडे लक्ष द्यावे. प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे अशा सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत ग्रामसेवकांना दिल्या.
बैठकीमध्ये आमसभा घेण्यात यावी अशी सूचना पत्रकार मोतीलाल जोगी यांनी मांडली.

Sandeep Jogi

Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595