मुक्ताईनगर प्रतिनिधी…. बोदवड सह मुक्ताईनगर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावरील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्र सारोळा येथील अंडरग्राउंड असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये मृत अवस्थेत बैल 31 मे रोजी आढळला होता. या संताप जनक घटनेमुळे ग्रामस्थ रस्त्यावर आले होते.
28 मे रोजी जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे दीड ते दोन लाख पाण्याची क्षमता असलेल्या अंडरग्राउंड पाण्याच्या टाकीमध्ये बैल पडला होता. 28 ते 31 तारखेपर्यंत पाण्याच्या टाकीजवळ तेथील कर्मचारी कसे गेले नाहीत हा एक प्रश्न आहे. नागरिकांच्या आरोग्याची खेळ करणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा चे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जाधव यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनीही जिल्हा परिषदेचे सीईओ व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून संबंधितांवर कारवाई करावी असे मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनीही सारोळा येथे भेट दिली होती.
रविवारी रात्रीपासून ‘ त्या ‘ पाण्याच्या टाकीचे कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर स्वच्छता करण्यात आली. तसेच सोमवारी दुपारी चार वाजता पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे मुक्ताईनगर ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता सुनील पाटील यांनी सांगितले.