मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
जळगाव उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव येथील उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी रा. शांतीनगर भुसावळ यांनी अवैध सावकारी बाबतचा चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी पाच लाख रुपयाची लाचेची मागणी केली होती. तळजोडी नंतर 3 लाख रुपये ठरले होते पहिला हप्ता दीड लाख रुपयाचा 20 मे रोजी घेताना जगदीश बारी व देवीसिंग धनसिंग पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचला होता.
तपासात बारी यांच्या घर झडती दरम्यान त्यांचे कॉसमॉस बँक भुसावळ येथे लॉकर असल्याची माहिती मिळाली होती. अधिकारी व कर्मचारी यांनी दोन पंचा समक्ष बँक लॉकर ची झडती घेतली असता त्यांना 99 लाख 4 हजार 960 रुपये किमतीचे सोन्याचे हार, बांगड्या व सोन्याचे बिस्किट, 8 लाख 36 हजार पाचशे रुपये रोख, 2625 रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा मुद्देमाल मिळून आला.
बारी यांना 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्यासह पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व कर्मचाऱ्यांनी 22 रोजी कारवाई केली.