Homemuktainagarसर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले ऑनलाईन करावेत... तहसीलदार गिरीश वखारे

सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले ऑनलाईन करावेत… तहसीलदार गिरीश वखारे

-

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर यांचेमार्फत सर्व केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या (मोबाईल उपलब्ध असल्यास ) /इतर कोणत्याही नातेवाईकामार्फत अथवा गावपातळीवरल ग्राम महसूल अधिकारी / ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक / कर्मचारी यांचे मार्फत अथवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इ. मार्फत हयात प्रमाणपत्र / DLC (Digital Live Certificate) ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे काम मुदतीत पुर्ण करावयाचे आहे. याकामी शासनाकडुन Beneficiary Satyapan App दिलेले असुन सदरचे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे. या अॅपव्दारे वरील सर्व योजनेच्या लाभार्थ्याचे फोटो काढुन हयातीचा दाखला ऑनलाईन सबमीट करावयाचा आहे. आणि त्याची एक प्रत मुक्ताईनगर तहसिल कार्यालय संजय गांधी निराधार योजना शाखेत जमा करावी. या लाभार्थी यांची यादी ग्राम महसुल अधिकारी/तलाठी यांचे सजेवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

काही अडचण असल्यास ग्राम महसुल अधिकारी (तलाठी)/ महसुल सेवक (कोतवाल ) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार गिरीश वखारे यांनी केलेले आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts