शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
मलकापुर:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नगरातील आई तुळजाभवानी मंदिरात माल्या अर्पण करून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,राजुभाऊ वाडेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.तसेच छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून माल्यार्पण करण्यात आले, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व दाताळा येथील सेवातीर्थधाम वृद्धाश्रमातील वृद्धांना फळे, बिस्कीट वाटप आत्मानंद जैन मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी सह संपर्कप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शकील जमादार, माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे, कामगार सेना तालुका प्रमुख राम थोरबोले, किसान सेना उपतालुकाप्रमुख विश्वनाथ पुरकर, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, लक्ष्मण दोळे,विजय झांबरे,नासीरभाई,चाॅद चव्हाण, किशोर राउत, गणेश सुरळकर सह आदिंची उपस्थिती होती.

