Homebuldhanaबीड जिल्ह्यात धाडसी कारवाई; आंतरराज्य दरोडेखोर टोळी जेरबंद, 12.48 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात धाडसी कारवाई; आंतरराज्य दरोडेखोर टोळी जेरबंद, 12.48 लाखांचा मुद्देमाल जप्त

-

बुलढाणा, दि. 3 मे 2026: किनगांव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला असून आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पिस्टल, काडतुसे, मोबाईल, वाहने आणि रोख रकमेसह एकूण 12 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी अभयसिंह आनंदसिंह वाघेला (वय 32, रा. लवाना, ता. लाखणी, जि. बनासकाठा, गुजरात) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10.45 वाजता ते नागपूर येथून गुजरातकडे समृद्धी महामार्गाने जात असताना दुसरबीड टोलनाक्याजवळ त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनाच्या टायरची हवा तपासत होते. त्यावेळी बोलेरो व इनोव्हा या दोन वाहनांतून आलेल्या 10 ते 12 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली. आरोपींनी त्यांना जबरदस्तीने त्यांच्या वाहनात बसवून सुमारे 8 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ आणि 12 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर फिर्यादीला जालना परिसरातील जंगलात सोडून आरोपी फरार झाले.

या घटनेनंतर किनगांव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 177/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत धाडसी कारवाई करून आठ आरोपींना जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि जम्मू-कश्मीर येथील सदस्यांचा समावेश आहे, ज्यामुळे ही टोळी आंतरराज्य स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अटक आरोपींकडून 1 लाख 80 हजार रुपये रोख, देशी बनावटीची पिस्टल, चार जिवंत काडतुसे, इनोव्हा व बोलेरो ही दोन वाहने, चार मोबाईल फोन, दोन वायफाय उपकरणे आणि अन्य साहित्य असा एकूण 12 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास किनगांव राजा पोलीस ठाणे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोडा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली. तसेच बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचेही या कारवाईत सहकार्य लाभले.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts