HomeChikliपक्षासोबत एकनिष्ठ सुनिल सोनुने यांची राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी निवड

पक्षासोबत एकनिष्ठ सुनिल सोनुने यांची राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी निवड

IMG 20260723 WA0259                                                                                                                                                                                प्रतिनिधी बुलढाणा राष्ट्रवादीने नुकत्याच जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारिणीत अनेक निष्ठावान कार्यकत्यांना पदे देवून त्यांच्यात उत्साह भरण्याचे काम करण्यात आले आहे सागवनचे सुनिल पांडुरंग सोनुने त्यापैकीच एक असून त्यांना बुलढाणा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने विदर्भ प्रभारी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या सुचनेवरून आणि जिल्हाध्यक्ष नरेश शेळके दक्षीण विभाग आणि प्रसेनजीत पाटील उत्तर यांनी सुनिल सोनुने यांची बुलढाणा तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे जवळपास १५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असूनही एक सामाजिक नेतृत्व म्हणून सुनिल सोनुने यांची ओळख आहे

डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी समाजकारणाचा मार्ग निवडला, त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे ग्रामसेवा सहकारी सोसायटीमध्ये संचालक म्हणून ते निवडून आले. त्यांची पत्नी सौ. अर्चनाताई सागवन ग्रामपंचायतच्या सदस्या असून कृउबास बुलढाणा येथे संचालिका म्हणून कार्यरत आहे. इतर पक्षांकडून प्रवेशासाठी विविध आमिषे झिडकारून राष्ट्रवादीतच टिकून राहणाऱ्या सुनिल सोनुने यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा तालुक्यातील पक्ष संघटनेत उत्साह संचारला आहे. त्यांच्या चाहत्यांनी सदर निवडीचे जोरदार स्वागत केले आहे.

या निवडीबद्दल सोनुने यांनी डॉ. शिंगणे तसेच नरेश शेळके यांचे आभार मानले आहेत. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, ‘संघटनात्मक बांधणीवर जोर आणि गांव तिथे शाखा हा उपक्रम राबतविण्याला प्राथमिकता दिली जाईल. शरद पवार साहेबांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू तसेच बुलढाणा तालुक्यात राष्ट्रवादीला सर्वच बाबतीत आघाडीवर ठेवू’, या शब्दांत श्री सोनुने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments