muktainagar

मुक्ताईनगर येथे आमदार खडसे व आमदार पाटील यांनी केली कुटुंबाची स्वतः स्व – गणना

मुक्ताईनगर येथे आमदार खडसे व आमदार पाटील यांनी केली कुटुंबाची स्वतः स्व – गणना

मुक्ताईनगर प्रतिनिधी….  भारताच्या जनगणना 2027 या कार्यक्रमानुसार मुक्ताईनगर येथे १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे व विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी पोर्टलच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीने (स्व- गणना) नोंदवून घेतलेली आहे. प्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे , निवडणूक नायब तहसीलदार झांबरे , मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मुख्यधिकारी सतीश पुदाके , जनगणना ऑपरेटर सिद्धांत बोदडे उपस्थित होते.

 

1 मे ते 15 मे दरम्यान स्व जनगणना ला सुरुवात झालेली असून आपण स्वतः आपल्या कुटुंबाची माहिती स्व गणना पद्धतीने स्वयंस्फूर्तीने भरून मोहिमेत आपण स्वतः व शेजारील नागरिकांनी सुद्धा सहभाग घेण्याचे आवाहन विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेले आहे.

 

भारत देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि योग्य नियोजनासाठी जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन करीत नागरिकांनी आपली जबाबदारी समजून १ मे ते 15 मे दरम्यान स्व गणना मध्ये 33 प्रश्नांची अचूक उत्तरे भरायची आहेत. मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी केलेले आहे.

प्रशासनाच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनी विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांचे खडसे फार्महाऊस वर व विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांकडून स्वतः कुटुंबाची स्व गणना भरून घेतली.

Sandeep Jogi

Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595