muktainagar

मुक्ताईनगर शहरात दुपारी साडेतीन वाजता जोरात वादळ,……आमदार चंद्रकांत पाटील पोहोचले थेट प्रभागांमध्ये नुकसानाची पाहणी करायला.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…. मुक्ताईनगर तालुक्यात व शहरांमध्ये शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळासह पाऊस गरजला.
मुक्ताईनगर शहरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात चक्री वादळासह पावसाला सुरुवात झाली होती.
तात्काळ आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे नगरसेवकांसह नुकसान झालेल्या प्रभागांमध्ये पाहणी करण्यासाठी गेले.
शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील नारायण नगर भागातील मोठे निंबचे झाड विजेच्या तारांवर पडल्याने दोन्ही बाजूकडील इलेक्ट्रिकचे सिमेंटचे पोल अर्ध्यातून तुटले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी विद्युत विभागाचे अभियंता यांच्याशी बरोबर संपर्क साधून तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यासाठी जेसीबी चालकाला फोन करून जेसीबी मशीन मागवण्यात आले. दुपारी तीन वाजेपासून मुक्ताईनगर शहरातील विजपुरवठा ठप्प झालेला आहे.
यावेळी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी सतीश पुदाके, उपनगराध्यक्ष देवयानी शिरसाट यांचे पती माजी नगरसेवक निलेश शिरसाट, प्रभाग 17 चे नगरसेवक बाळू चिंचोले, माजी नगरसेवक पीयुष मोरे, प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये पण वादळामुळे झाडे पडली होती. प्रभाग 14 चे नगरसेवक प्रमोद भारंबे, स्वीकृत नगरसेवक नितीन जैन यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले.

Sandeep Jogi

Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595