Nandura

नांदुरा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची शिवसेना (उबाठा)ची तहसीलदारां मार्फत जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी


नांदुरा:- नांदुरा तालुक्यात मागील ३८ दिवसांपासून पाऊसचा थेंब नाही, खरडी बरडी वरील पिके १००% गेलेली आहे तर सोयाबीन, कापूस,तूर , ज्वारी ही पिके सुकत आहे शेतकरी चिंताग्रस्त आहे काही शेतकरी कस होईल या चिंतेने जिवाचे काही ही करु शकतो म्हणून शिवसेना( उध्दव ठाकरे) पक्षाचे वतीने शासनाने ज्यांनी पिक वीमे काढले त्यांना १००% विमा देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिकं विमा भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये देण्यात यावे यासह इतर शेतकऱ्यांच्या हिताचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नांदुरा तालुक्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे नांदूरा तालुक्यातील शेतकरी आर्थिक परिस्थितीमध्ये सापडलेला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतातील कामे खते व फवारणी करून आपल्या शेतात पिकांची पेरणी केली मात्र पावसाअभावी सोयाबीन, तूर, कपाशी, खरीप पिके पाण्याअभावी वाळून गेली आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर करूनही अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे, तरी शासनाने या परिस्थितीत दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी नांदुरा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, कर्जबाजारी संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णू धोरण, राजेश पालकर, पुरुषोत्तम सोनवणे, अनिल राहणे, प्रशांत पेटकर, आक्रोश तारू, इमरान लकी, सै. वसीम सै रहीम, पुरुषोत्तम बाभुळकर, विनोद होणाळे, अमोल तायडे, ऋषिकेश तायडे, दिलीप कोल्हे, रामकृष्ण वानखेडे, गोपाळ देवकर, विनोद बावस्कर, अरुण अढाव, निलेश अढाव, योगेश अहिर, आकाश धांडे, उखर्डा लाहुडकर, ज्ञानेश्वर खंडागळे, रविकांत गावंडे, राहुल खंडेराव, सुभाष पांडे, गजानन खंडागळे सह तालुक्यातील शेतकरी व शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply