पत्नी माहेरी थांबल्याच्या कारणावरून पतीने केला पत्नीवर चाकूने वार…. आरोपी पतीला मध्यप्रदेशातील बोईसर येथून पोलिसांनी घेतले ताब्यात.
मुक्ताईनगर प्रतिनिधी….
तालुक्यातील भानगुरा येथील माहेर व खामखेडा येथील सासर असलेल्या पत्नीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन त्या माहेरी राहिल्याच्या कारणावरून पतीने त्यांच्यावर चाकूने वार केल्याची घटना 19 मे रोजी दुपारी बारा वाजता भानगुरा गावात घडली.
याप्रकरणी भानगुरा येथील नयना प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथील धोंडू देवराम पाटील हे आपली पत्नी प्रमिलाबाई धोंडू पाटील यांना शारीरिक व मानसिक त्रास देत त्या माहेरी भानगुरा येथे थांबल्याचा राग आल्याच्या कारणावरून धोंडू पाटील यांनी प्रमिला पाटील , फिर्यादीचे सासरे शिवदास पाटील, फिर्यादीचा मुलगा ललित पाटील यांच्यावर धारदार चाकूने वार करून जखमी केल्याची घटना 19 मे रोजी दुपारी 12 वाजता भानगुरा येथील फिर्यादीचे गुरांच्या वाड्यात घडली होती.
… पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक असीम तडवी, पोलीस अमलदार संदीप धनगर, पोलीस अमलदार अक्षय वाडे यांनी मध्य प्रदेशातील बोईसर येथून आरोपी धोंडू देवराम पाटील यांना ताब्यात घेतलेले असून त्याचे विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील करीत आहे.
अवघ्या 24 तासाच्या आत पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करीत आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील बोईसर येथून ताब्यात घेतले या धडक कारवाई तील पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.