jalgaon

जळगावात पुरातन व दुर्मीळ वस्तू, नाणी आणि नोटांचे भव्य प्रदर्शन

जळगाव : अ. मजीद जकेरिया बीबा परिवार व इकरा एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुरातन व दुर्मीळ वस्तू, नाणी व नोटा’ या विषयावर भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १९, २० व २१ सप्टेंबर २०२६ रोजी इकरा एच. जे. थीम कॉलेज, मेहरूण, जळगाव येथे भरविण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील इतिहास विभागाचे प्राध्यापक मा. मारुती जाधव साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. अ. करीम सालार यांनी सांगितले की, “जुनी नाणी, नोटा आणि ऐतिहासिक वस्तू या केवळ संग्रहातील वस्तू नसून आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे तसेच सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे जिवंत दस्तऐवज आहेत. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या ऐतिहासिक वारशाची जवळून ओळख होते आणि तो जतन करण्याची प्रेरणा मिळते.”

कार्यक्रमास मा. ॲड. अरुण धांडे साहेब, हाजी कादर टिक्की साहेब, एजाज मलिक साहेब, मा. मनोज चौधरी साहेब (उपमहापौर, जळगाव शहर महानगरपालिका), मा. सुरेश पांडे साहेब, मा. दत्तात्रय तुकाराम चौधरी साहेब तसेच जगतराव पाटील साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकरा एच. जे. थीम कॉलेजचे प्राचार्य विकार अहमद सर यांनी केले, तर जुबेर सर यांनी आभार मानले.

प्रदर्शनात विविध कालखंडांतील दुर्मीळ व पुरातन नाणी, जुन्या नोटा, टपाल तिकिटे तसेच विविध ऐतिहासिक वस्तू मांडण्यात आल्या आहेत. संग्रहकर्ता अ. मजीद जकेरिया बीबा, जळगाव यांच्या या दुर्मीळ संग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थी व नागरिकांना इतिहास आणि सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत आहे.

अ. मजीद जकेरिया बीबा यांनी सर्व विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांना या ऐतिहासिक व अनोख्या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुरातन नाणी, नोटा, टपाल तिकिटे आणि इतर दुर्मीळ वस्तूंसोबतच देशाचा इतिहास व सांस्कृतिक वारसा जवळून जाणून घेण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. इतिहास व संस्कृतीप्रेमींनी या अनमोल संग्रहाचे अवलोकन करण्यासाठी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply