मुक्ताईनगर मधून चार भाविक पवित्र शहर मक्का मदीना येथे हज साठी रवाना.
मुक्ताईनगर प्रतिनिधी…… मुक्ताईनगर येथील 5 रोजी मक्का मदिना येथे पवित्र हज साठी येथील नगरसेविका हलीमा बी शेख लूकमान बेपारी,शेख लुकमान शेख बशीर बेपारी व अल फलाह उर्दू हायस्कूल चे रफिक सर, व त्यांची पत्नी,हे चार लोक आज हज साठी रवाना झाले, असून इस्लाम धर्मामध्ये पाच स्तंभ आहेत त्यात पाचवा हज आहेत,प्रत्येक मुसलमान यांनी आयुष्यात एकदा तरी हज करावे जो शारीरिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल, हज दरवर्षी इस्लामी महिना मध्ये जिलहिजा मध्ये सौदी अरब मक्का मदिना येथे केले जाते,आज हे हज माणसाला ईश्वराचे जवळ करतोय, आज हे सर्व मुस्लिम बांधवांना एकत्र करतो,एकता टिकून ठेवतो, सर्व मुस्लिम बांधव, हज मुळे माणसाचे पाप गुन्हे ( माफ )होतात, हज मध्ये सर्व हाजी एकासारखे कपडे परिधान करतात त्याला (एहेराम) असे म्हटले जाते.आज माणसाला सब्र, त्याग अनुशासन शिकवतो, यावेळी हज ला जाणारे सर्व भाविकांचे मुक्ताईनगर मणियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी, लाल खान इगल ,डॉ मोहसीन यावल, खालिद सर, आदींकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

