अतिवृष्टीग्रस्त विवरा गावाला अखेर दिलासा, शिवसेना (उबाठा)च्या आंदोलनानंतर मदत निधी जमा; पदाधिकाऱ्यांचा जल्लोषात सत्कार

Advertisement

मलकापुर तालुक्यातील ग्राम विवरा येथे चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती वाहून गेली होती. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची संपूर्ण नासाडी झाली होती. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या या अतिवृष्टीनंतरही दीर्घकाळ मदत निधी न मिळाल्याने ग्रामस्थ तहसील कार्यालय व बँक प्रशासनाच्या चकरा मारून त्रस्त झाले होते.

अतिवृष्टीग्रस्त विवरा गावाला अखेर दिलासा, शिवसेना (उबाठा)च्या आंदोलनानंतर मदत निधी जमा; पदाधिकाऱ्यांचा जल्लोषात सत्कार
अतिवृष्टीग्रस्त विवरा गावाला अखेर दिलासा, शिवसेना (उबाठा)च्या आंदोलनानंतर मदत निधी जमा; पदाधिकाऱ्यांचा जल्लोषात सत्कार

या गंभीर परिस्थितीची माहिती ग्रामस्थांनी शिवसेना (उबाठा)चे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत आणि शहरप्रमुख हरीदास गणबास यांना दिली. यानंतर शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयात ‘झिंगे बोंबील भुजो’ आंदोलन छेडण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना देण्यात आला. आंदोलनाच्या धास्तीने तहसील प्रशासनाने तत्काळ कारवाई करत विवरा येथील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण 6 लाख 7 हजार रुपयांची मदत रक्कम जमा केली.

Advertisement

मदत निधी मिळाल्याने आनंद व्यक्त करत ग्रामस्थांनी 19 डिसेंबर रोजी सायंकाळी विवरा गावात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार केला. फटाके फोडून, डफडे वाजवत गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहरप्रमुख हरीदास गणबास यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अतिवृष्टीग्रस्तांना वेळेवर न्याय मिळावा यासाठी केलेल्या आंदोलनामुळे अखेर प्रशासन जागे झाले असून, मिळालेल्या मदतीमुळे विवरा गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Subscribe to Viral News Live