HomeMalkapurमॅंगलोर येथील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्र संघाची चमक; प्रा. सचिन बोरले यांची...

मॅंगलोर येथील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्र संघाची चमक; प्रा. सचिन बोरले यांची ‘चमू व्यवस्थापक’ म्हणून उल्लेखनीय कामगिरी

-

मलकापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील मॅंगलोर येथे नीट्टे डिम्ड-टू-बी युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा ठसा उमटवत विशेष यश संपादन केले. या शिबिरासाठी मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांची विद्यापीठाच्या वतीने ‘चमू व्यवस्थापक’ म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघाने राष्ट्रीय स्तरावर विशेष कौतुक मिळवले.

एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे मुख्य उद्दिष्ट विविध राज्यांतील संस्कृतींचे आदानप्रदान घडवून आणणे तसेच युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रभावना वृद्धिंगत करणे हे होते. देशातील ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांसह एकूण २५ राज्यांमधील संघांनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला होता. सात दिवस चाललेल्या या उपक्रमात प्रत्येक राज्याने आपल्या पारंपरिक कला, लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे प्रभावी सादरीकरण केले.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी लावणी, वीररसपूर्ण पोवाडा, कोळीगीते तसेच गणपती आराधना यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणामुळे इतर राज्यांतील सहभागी संघांकडून महाराष्ट्र संघाचे विशेष कौतुक करण्यात आले.

प्रा. सचिन बोरले यांनी चमू व्यवस्थापक म्हणून जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे तसेच प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभल्याचे प्रा. बोरले यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालय आणि विद्यापीठाचे नाव उंचावल्याबद्दल महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी प्रा. सचिन बोरले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची नोंद झाली आहे.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts