muktainagar

शिवसेना अनुसूचित जाती-जमाती सेना मुक्ताईनगर तालुका प्रमुख पदी राजेंद्र वानखेडे यांची नियुक्ती

शिवसेना अनुसूचित जाती-जमाती सेना मुक्ताईनगर तालुका प्रमुख पदी राजेंद्र वानखेडे यांची नियुक्ती

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मान्यतेने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) अनुसूचित जाती-जमाती सेना मुक्ताईनगर तालुका प्रमुखपदी राजेंद्र वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष बांधणीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे असे नियुक्ती पत्रामध्ये रावेर लोकसभा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी म्हटले आहे.
निवडीबद्दल राजेंद्र वानखेडे यांचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले असून प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख छोटू भोई, तालुकाप्रमुख नवनीत पाटील तसेच मित्रमंडळीं, स्नेहीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Sandeep Jogi

Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595