HomeMalkapurठेकेदाराने दादागिरीने शेतातून रस्ता खोदल्या प्रकरणी तहसीलदार,सां.बा विभागाकडे कडे तक्रार; शेतकऱ्याचे खोदलेले...

ठेकेदाराने दादागिरीने शेतातून रस्ता खोदल्या प्रकरणी तहसीलदार,सां.बा विभागाकडे कडे तक्रार; शेतकऱ्याचे खोदलेले शेत पूर्वत करून नुकसान भरपाई देण्याची शिवसेना (उबाठा)ची मागणी 

-

ठेकेदाराने दादागिरीने शेतातून रस्ता खोदल्या प्रकरणी तहसीलदारसांबा विभागाकडे कडे तक्रार शेतकऱ्याचे खोदलेले शेत पूर्वत करून नुकसान भरपाई देण्याची शिवसेना उबाठाची मागणी

मलकापुर:-:तालुक्यातील लासुरा येथील गट नंबर 58 मध्ये सारिका साहेबराव गारमोडे रा. काटी ता. नांदुरा जि. बुलढाणा यांचे शेत असून त्यांच्या शेतात विनापरवानगीने शेत रस्ता खोदण्याचे काम सां.बा विभागामार्फत मयूर मुकंद मापारी रा. खैरा यांनी केले असून सदरचा रस्ता गट नंबर 58 मधून न जाता ठेकेदार यांनी शहानिशा केली नसल्याने गारमोडे यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याबाबतची तक्रार शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह संबंधित शेतकऱ्याने तहसीलदार समाधान सोनवणे, सां.बा विभाग अभियंता सचिन तायडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून खोदलेले शेत पूर्ववत करून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की सारिका साहेबराव गारमोडे रा. काटी यांचे लासुरा येथील गट नंबर 58 मध्ये शेत आहे, सा.बां विभाग मलकापूर यांचे मार्फत मयूर मुकुंद मापारी हे बांधकाम ठेकेदार असून मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद योजनेअंतर्गत मौजे लासुरा ते टाकरखेड रस्त्याचे काम त्यांनी घेतले आहे. गट नंबर 58 मधून त्यांनी हे काम जबरदस्ती व दादागिरी ने सुरू केले आहे, याबाबत त्यांना विचारणा केली असता इथून निघून जा सरकारी कामात अडचण निर्माण करू नका अन्यथा शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली… त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले सदरचे काम कायदेशीर सुरू आहे परत-परत फोन करू नका नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू अशी धमकी दिल्याने व गट नंबर 58 मधून हा रस्ता नसल्यानेच आमच्या शेत दीड ते दोन एकर खोदल्यामुळे व त्या ठिकाणी सुपीक माती संपली असून सदर खोदकामामुळे उर्वरित क्षेत्र शेती लागवडीसाठी तयार करणे शक्य राहिले नाही आमची उपजीविका शेतीवरच असून शेती व्यतिरिक्त दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्याने ठेकेदाराने केलेल्या मनमानी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे सदर शेतकऱ्याची शेती पूर्वत करून द्यावे व शेतकऱ्याचे झालेले तीन लाखाचे आर्थिक नुकसान भरपाई व दादागिरी करणाऱ्या ठेकेदारांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ पुरकर, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी,सारीका साहेबराव गारमोडे यांनी केली आहे.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts