मलकापुर:- ग्राम विवरा येथील नाला खोलीकरण काम संबंधित ठेकेदाराने अपूर्ण सोडले असून ते काम पूर्ण करण्यात यावे तसेच मागील वर्षी 16 सप्टेंबर 25 रोजी विवरा येथे ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसून शेकडो ग्रामस्थांचे नुकसान झाले होते शासनाच्या निकषाप्रमाणे सानुग्रह निधी मिळाला ,मंजुर झालेला नाला खोलीकरण काम पूर्ण करण्यात यावे, तसेच मौजे विवरा -रणगांव रस्ता मंजूर असून त्या रस्त्यामध्ये गावाजवळ दलित वस्ती असून संपूर्ण गावातील सांडपाणी दलित वस्तीला लागून साचलेले असते त्या ठिकाणी नाली बांधकाम करून रस्ता कॉंक्रिटीकरण करून पूर्ण करण्यात यावा अन्यथा दि.1 हे महाराष्ट्र दिनी त्या सांडपाण्यात ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला अहे.निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास ,वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, ओंकार पाटील,हरीदास शिंदे सह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या नमूद आहे.
Top 5 This Week
Related Posts
ग्राम विवरा येथील नाला व रणगांव अपूर्ण राहिलेला रस्ता तात्काळ करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार यांना शिवसेना (उबाठा) चे निवेदन

Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people.
He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media.
Contact Information
Email: zafar@viralnewslive.in
Mobile: +91 9881850730




