देवधाबा येथील ईले.पोल वरील तार अज्ञात चोरट्यांनी पाच वर्षांपूर्वी लंपास केले….शेतकरी म.रा.वि.वि कंपनीत चपला घासून थकले; पोलवरील तारा ओढण्याची शिवसेना (उबाठा) ची मागणी
मलकापुर:- तालुक्यातील देवधाबा येथील गट नंबर 193 मधील 18 ईले.पोलवरील विद्युत तार गेल्या पाच वर्षांपूर्वी चोरीला गेले असून शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार मलकापूर ग्रामीण पो.स्टे मध्ये म.रा.वि वि कंपनीकडे केल्या दोन्ही ठिकाणी तक्रारी देऊन सुद्धा निगरगट्ट प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना आज दिल्याने शेतकरी गोपाळसिंग प्रतापसिंग सोळंके, निलेश हरीभाऊ कऱ्हाळे, गजानन लांडे सह उपकार्यकारी अभियंता खान यांना निवेदन देऊन, शेतातील विहिरी मध्ये पाणी उपलब्ध असून सुद्धा निगरगट्ट प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत,पाच दिवसांत देवधाबा येथील शेतातील तारा न ओढल्यास शिवसेना शेतकऱ्यांसह म.रा.वि.वि कंपनी कार्यालयात ठेचा भाकर खाओ आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

