Homemuktainagarधरणगाव तालुक्यातील भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध...

धरणगाव तालुक्यातील भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

-

मुक्ताईनगर प्रतिनिधी….. अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयास प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे २७ मे २०२६ रोजी भवरखेड, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे बनावट दूध निर्मिती करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.

सोमनाथ आनंदा माळी (वय ३०) यास खाद्य तेलाचा वापर करून बनावट दूध तयार करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रंगेहात पकडले. तपासणीदरम्यान रिफाइन्ड पामोलीन तेलाचा वापर दुधातील वसा (फॅट) वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत दोन गाईच्या दुधाचे तसेच एक खाद्यतेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. तसेच उर्वरित अंदाजे २६६ लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा पंच भवरखेडेचे पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.

कारवाईदरम्यान आरोपी हा लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगून घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये २८ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वीही दुधात भेसळ केल्याप्रकरणी पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली होती. त्या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दि. २९ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, भा.प्र.से. तसेच सह आयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे, नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे, शरद पवार व आकाश बोहाडे यांचा सहभाग होता.

परिसरात कुठेही बनावट दूध अथवा अन्न भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts