muktainagar

सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज …….आमदार चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर प्रतिनिधी ….. भीमस्टार फाउंडेशन उचंदे या संस्थेमार्फत बौद्ध धर्मीय ४९ जोडप्यांचा सामूहिक विवाह २५ मे रोजी मुक्ताईनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे विवाह विधि बौद्धाचार्य डॉ.के. वाय. सुरवाडे गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाला.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील होते. त्यांनी नवोदित वधू-वरांना मंगल कामना दिल्या. वाढती महागाई पाहता सामान्य माणसाने कर्ज काढून विवाह करण्यापेक्षा सामूहिक पद्धतीने विवाह करणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले .
दीपपूजा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी केली, धूपपूजा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील आणि नंदू हेरोळे यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते एन.जी. शेजोळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आयु रवींद्र मोरे , जिल्हा संघटक उप प्राचार्य संजय साळवे , सुनील आढागळे , जनार्दन बोदडे विशेष उपस्थिती दिनकर निकम पिंपरीनादू , एस के तायडे ,
.गौतम प्रधान उद्योजक वापी यांनी जोडप्यांना डिनर सेट भेट वस्तू दिली . प्रमुख पाहुणे आर जी भालेराव .मुकेश वानखेडे ,किशोर बोदडे , पत्रकार
मोहन मेढे , नाना बोदडे , काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख चेतन झनके ,वसंत लोखंडे , सौ सविता इंगळे , प्रमोद इंगळे उपस्थित होते.
सामूहिक विवाह सोहळा सहकार्य समिती गजानन सुरवाडे , महिंद्र हिरोडे, दीपक धुंदले ,प्रवीण इंगळे ,लखन पानपाटील , अनिल वाघ , रतन तायडे, प्रवीण वाघ , नीरज इंगळे, गजानन जाधव, मोहन वाघ, जितू झाल्टे हे होते.
कार्यक्रमाचे स्वागत शांताराम मोरे. रवी शेजवडे
कार्यक्रमाचे आयोजन भिमस्टार फाउंडेशन उचंदे अध्यक्ष दीपक इंगळे ,सदस्य साधनाताई शेजवडे ,उज्वला जाधव,जितेंद्र भालेराव व सर्व सदस्य यांनी केले होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सुरवाडे ,आभार आकाश शेजोळे यांनी मानले.

Sandeep Jogi

Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595