muktainagar

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी ॲड. राहुल पाटील तर विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी नितीन गोसावी यांची नियुक्ती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी ॲड. राहुल पाटील तर विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी नितीन गोसावी यांची नियुक्ती

मुक्ताईनगर प्रतिनिधी….

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी ॲड. राहुल अशोक पाटील तर विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी नितीन बळीराम गोसावी ( हिवरा तालुका मुक्ताईनगर) यांची नियुक्ती संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांनी केलेली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व उपनेते संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार कार्याचा विस्तार करण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे व आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करावी, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Sandeep Jogi

Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595