संत ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक 15 मधील महिलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने हरीश रावळ सह पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून केला सन्मान
मलकापुर:- शहरातील संत ज्ञानेश्वर नगर, सातव प्लाॅट, प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या आठ महिन्यापासून पंधरा ते वीस घरांना पाणी येत नसल्याने पाणीपुरवठा अभियंता बयस यांच्या कार्यालयातच माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ॲड हरीश रावळ, अनिल बगाडे सह महिलांनी ठिय्या आंदोलन केले होते. या भागात न.प.ने नव्याने पाईपलाईन करून उपरोक्त घरांना काल पाणीपुरवठा सुरळीत केल्याने, आज दि.18 मे 26 रोजी या भागातील महिलांनी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ॲड हरीश रावळ, माजी नगरसेवक अनिल बगाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कमलबाई भोपळे,विशाल भोपळे, मेघा भोपळे ,चंदुभाऊ वायडे,छोटुभाऊ ईसाळकर,गणेश खराटे,उषाबाई खराटे ,भोनाजी वायडे, नारायण दिवकार ,पांडुरंग जगताप,जिजाबाई जगताप,
संगिता भोपळे,शामकांत जोशी
गजानन वायडे ,सरलाबाई वायडे,मंजुळाबाई दिवकार सह आदिंची उपस्थिती होती.
